संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारताच्या दूर पल्ल्याच्या पहिल्यावहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची काल उड्डाण चाचणी घेतली. ओदिशातल्या ए पी जे अब्दुल कलाम बेटावरुन या क्षेपणास्त्राने यशस्वी उड्डाण केलं. सशस्त्र दलांसाठी पंधराशे किलोमीटरपेक्षा दूर पल्ल्याचं विविध पेलोड घेऊन जाण्याची क्षमता या क्षेपणास्त्राकडे आहे. या यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO, तसंच लष्कर आणि संरक्षण सामुग्री उत्पादन उद्योगांचं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. “हे ऐतिहासिक यश असून, अशा प्रकारच्या गुंतागुतीच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता बाळगणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे”, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.