मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास कार्यालयातल्या या योजनेच्या समन्वयक सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जाधव यांची ही पूर्ण मुलाखत प्रासंगिक या सदरात उद्या बुधवारी प्रसारित केली जाणार आहे.नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत ७० हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. गावोगावी अर्ज भरून घेण्यासाठी शिबीरं घेतली जात आहेत. महापालिकेअंतर्गतही अर्ज भरून घेण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करू नये तसंच कोणी पैसे मागत असतील तर त्यांची तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
Site Admin | July 16, 2024 12:46 PM | Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना