कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्यसाखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलच्या mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
चालु वर्षातल्या खरीप हंगामासाठी नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर मेटाल्डीहाईड सोयाबीनसाठी २३ जूनपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. या अर्जातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.