नंदुरबार शहरातल्या एक शाळेत पाचवीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्या प्रकरणी आज सकल मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे. मात्र यात शाळा मुख्याध्यापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार आहेत. यातील दोषीचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा सोबतच दोषींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी यावेळी मोर्चकऱ्यांकडून करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला आणि युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | September 5, 2024 3:41 PM | Molestation | Nandurbar