राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे १ हजार ६२ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे.
या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.