डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 10:51 AM | ABZayed | S Jayshankar

printer

भारत-संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहारमंत्री भूषवणार

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान आज नवी दिल्ली येथे १५ व्या भारत- संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन्ही नेत्यांनी काल नवी दिल्लीत धोरणात्मक बैठकीत चर्चा केली. धोरणात्मक चर्चा हे एक प्रभावी व्यासपीठ असून याद्वारे परस्पर संबंधांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा