डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 17, 2024 8:10 PM | Europe | Storm Boris

printer

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला. पोलंडमधे पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले. या वादळाचा फटका बसून गेला महिनाभर दक्षिण पोलंडमधे जनजीवन प्रभावित झालं आहे.  सुमारे ५ हजार सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत. रुमानियात ७ जण मृत्यूमुखी पडले असून येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत नुकसानग्रस्त भागात सरकारने आणीबाणी जाहीर केली आहे. चेक गणराज्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १३ हजार आपद्ग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. ऑस्ट्रियात ४ जण मरण पावले असून हजारो घरांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा