उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ७४१ अंकांनी वधारला आणि ७७ हजार ५०१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५९ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ५०८ अंकांवर बंद झाला. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकूण अनुक्रमे २ हजार १३४ आणि ६७९ अंकांची वाढ झाली.
उद्याचा अर्थसंकल्प हा विकासपूरक असेल, अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाल्याने ही वाढ झाल्याचं मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलं आहे.