देशातल्या शेअर बाजारात आज मोठे चढ – उतार दिसून आले. सकाळच्या सत्रात सुमारे बाराशे अंकांनी घसरुन सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण नंतर बाजारात तेजी सुरू झाली आणि दिवसअखेर सेन्सेक्स ८४३ अंकांनी वधारुन ८२ हजार १३३ अंकांवर बंद झाला. निफ्टी २२० अंकांची तेजी नोंदवून २४ हजार ७६८ अंकांवर स्थिरावला. वर्षअखेर आणि सुट्या यामुळं ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण वाढेल, अशी आशा आहे. त्यातच अमेेरिकेकडूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा व्यवसाय मिळेल, अशी शक्यता निर्माण झाल्यानं बाजारात तेजी दिसून आली.
Site Admin | December 13, 2024 7:43 PM | Stock Market