मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज ८१० अंकांची उसळी घेतली आणि तो ८१ हजार ७६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४१ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ७०८ अंकांवर बंद झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं शेअर बाजारातल्या सूत्रांनी सांगितलं.
Site Admin | December 5, 2024 7:08 PM | Stock Market