भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज १ हजार ९६१ अंकांची वाढ झाली आणि तो ७९ हजार ११७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ५५७ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ९०७ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये आज वाढ दिसून आली. यात बँकिंग, संपर्क, माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातल्या ५९ कंपन्यांनी आज आपला गेल्या ५२ आठवड्यांमधला उच्चांक गाठला. दरम्यान, परकीय चलन बाजारात आज रुपया चार पैशांनी वाढून अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत ८४ रुपये ४५ पैशांवर स्थिरावला.
Site Admin | November 22, 2024 7:15 PM