भारतीय शेअर बाजारावर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच तीव्र घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीन हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला असून निफ्टी १ हजारांहून अधिक अंकांनी घसरला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ घोषणांमुळे व्यापार क्षेत्रात तयार झालेला ताण आणि अमेरिकेत मंदी येण्याच्या भीतीचा तीव्र परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसत आहे.
सध्या सेन्सेक्स ३ हजार ३००पेक्षा जास्त अंकांनी घसरून ७२ हजार ६६ अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. तर निफ्टीही १ हजारापेक्षा जास्त अंकांनी घसरून २१ हजार ८०० अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे.