अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज १ हजार ३९० अंकांनी घसरुन ७६ हजार २४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५४ अंकांची घट नोंदवून २३ हजार १६६ अंकांवर स्थिरावला. तेल आणि नैसर्गिक वायू तसंच दूरसंचार क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रातले समभाग आज घसरले. राज्यात रेडी रेकनर दर वाढल्याचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांवर झाला.
Site Admin | April 1, 2025 7:49 PM | Stock Market
शेअर बाजारात मोठी घसरण
