देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली तेजी या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७९ अंकांची तेजी नोंदवून ७७ हजार ९८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३०८ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ६५८ अंकांवर स्थिरावला.
सत्रादरम्यान सेन्सेक्सनं ७८ हजारांची आणि निफ्टीनं २३ हजार ७०० ची पातळी ओलांडली होती. बँकांच्या समभागांमध्ये आज जोरदार वाढ दिसून आली. गेल्याच आठवड्यात या दोन्ही निर्देशाकांनी ४ वर्षातली आठवडाभरातली सर्वोत्तम तेजी नोंदवली होती. रुपयाची मजबुती परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सुमारे साडे ७ हजार कोटी रुपयांची खरेदी केली.