देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच आठवड्यात एवढी मोठी तेजी नोंदवली आहे. डॉलरच्या तुलनेत बळकट होणारा रुपया, कमी दरात उपलब्ध असलेले समभाग, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचं पुनरागमन यासारख्या कारणांमुळं बाजारात तेजी दिसून येते आहे, असं विश्लेषकांचं मत आहे.
Site Admin | March 22, 2025 8:39 PM | Indian stock market
देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी
