शेअर बाजारात आज सलग आठव्या सत्रात घसरण कायम राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला आणि ७५ हजार ९३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०२ अंकांनी घसरला आणि २२ हजार ९२९ अंकांवर बंद झाला.
तेल आणि वायू, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, आणि ऊर्जा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांचे समभाग आज घसरणीच्या दबावाखाली राहिले.
शेअर बाजारातल्या गेल्या ८ सत्रांमधल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी तब्बल २५ लाख ३१ हजार कोटी रुपयांची संपत्ती गमावली. या काळात सेन्सेक्समध्ये ३ टक्के, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ३ पूर्णांक ४१ शतांश टक्के घट नोंदवली गेली.
जागतिक व्यापार युद्धाच्या प्रभावामुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ आटेल, या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं.