पाच दिवसांच्या मंदीनंतर आज देशातला शेअर बाजार तेजीत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ६०३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३३९ अंकांवर बंद झाला. बँक, वस्तू, दूरसंवाद, आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.
Site Admin | October 28, 2024 7:08 PM | Nifty | Sensex
शेअर बाजार पुन्हा तेजीत, सेन्सेक्समधे ६०३, तर निफ्टीत १५८ अंकांची वाढ
