हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला महाराष्ट्र राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र अंतर्गत आणि केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल क्वालिटी ॲशोरन्स अंतर्गत केलेल्या परीक्षणाद्वारे हिंगोली जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाला’ राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. येत्या स्वातंत्र्य दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.