एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला. परिणामी पुणे, सातारा, नाशिक, सांगलीसह राज्यभरातील अनेक आगारातून एसटी बस बाहेर पडल्या नाहीत. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना एस. टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दरम्यान मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप बेमुदत सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज बुधवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
Site Admin | September 4, 2024 10:51 AM