राज्याच्या लोकायुक्त कार्यालयानं २०२३ मधे ४ हजार ५५५ प्रकरणं निकाली काढली, तर वर्षअखेर ४ हजार ८१८ प्रकरणं प्रलंबित राहिली. राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे, आणि उप लोकआयुक्त संजय भाटिया यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. त्यात ही माहिती दिली आहे.
२०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारी नोंदवण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला ४ हजार ५८३ प्रकरणं प्रलंबित होती. त्यामुळे २०२3 मध्ये ९ हजार ३७३ प्रकरणं कार्यवाहीसाठी समोर होती, असं या अहवालात नमूद केलं आहे.