वाढती लोकसंख्या, महानगरांची होणारी वाढ, औदयोगिक क्षेत्रं यामुळे अग्निशमन सेवेचं कार्य आव्हानात्मक झालं असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ काल राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत झाला; त्यावेळी ते बोलत होते. मुंबई अग्निशमन दल तसंच तसेच राज्याच्या इतर महानगर पालिकांमधल्या ८ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. अग्निशमन विषयाच्या सर्वंकष अध्ययनासाठी एक संशोधन संस्था निर्माण करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
Site Admin | April 15, 2025 8:55 AM | अग्निशमन सेवा सप्ताह | राज्यपाल
राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ
