डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज स्थगित, ९ तारखेला अध्यक्षांची निवड

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशीष जयस्वाल या तालिका सदस्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह १७३ सदस्यांचा शपथ विधी आज झाला. उद्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड येत्या सोमवारी होईल. 

दरम्यान, ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध म्हणून विरोधी पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. समाजवादी पक्ष आणि इतर चार आमदार वगळता विरोधी बाकांवरच्या आमदारांनी शपथ घेतली नाही.

दरम्यान, ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध म्हणून विरोधी पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे चार आमदार वगळता विरोधी बाकांवरच्या आमदारांनी शपथ घेतली नाही. महायुती निवडणुकीत गैरप्रकार करून सत्तेवर आल्याची राज्यातल्या बहुतांश जनतेची भावना आहे, या भावनेचा आदर करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.  सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडीतली ईव्हीएमविरोधातली लढाई काँग्रेस देशभरात पोहोचवणार असल्याचंही पटोले म्हणाले. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं.

भाजपाचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांच्या या भूमिकेचा निषेध केला. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा