राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी नियमावली तयार केली आहे. ही तपासणी १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे आरोग्यप्रमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी केली जाणार आहे.
Site Admin | January 8, 2025 8:48 PM | Health department