कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा, असं खासदार नारायण राणे आज म्हणाले. ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभन कामाचं लोकार्पण आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. तर सिंधुदुर्ग किनारपट्टीचा विकास सिंगापूरच्या धर्तीवर करण्याला आपलं प्राधान्य असून त्यासाठी सिंगापूरच्या अभियंत्यांना इथं आमंत्रित केलं आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. अशा विकासकामांसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही चव्हाण यांनी केलं.
Site Admin | August 9, 2024 7:36 PM | Narayan RANE
कोकण रेल्वेमार्गावरच्या स्थानकांचं सुशोभिकरण आणि फलाटावर शेड उभारण्याच्या कामासाठी राज्यशासनाकडून प्रस्ताव पाठवावा – खासदार नारायण राणे
