यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पुरस्कार देऊन गौरवणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ई- मेल वर ३१ ऑगस्टपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असं आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
Site Admin | August 6, 2024 7:29 PM