राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक असून त्याबद्दल लवकर निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे करावं, केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ, अतिरिक्त सचिव पदाची निर्मिती तसंच रिक्त पदांची भरती, सुधारित सेवानिवृत्तीची अधिसूचना काढावी इत्यादी महासंघाच्या मागण्या आहेत.
आचारसंहितेमुळे प्रलंबित राहिलेल्या या मागण्यांवर तातडीनं निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी चर्चा झाल्याची माहिती अधिकारी महासंघाने या पत्रकात दिली आहे.