रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात ३ पूर्णांक ८९ शतांश टक्के सरासरी वाढ झाली आहे. मुंबईत ३ पूर्णांक ३९ शतांश टक्के तर राज्यातल्या इतर महानगरपालिकांमधे रेडीरेकनरचे दर ५ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढवण्यात आले आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात ४ पूर्णांक ९७ शतांश टक्के वाढ झाल्याचं सरकारने कळवलं आहे. नवी मुंबई ६ पूर्णांक ७५ शतांश टक्के, ठाणे ७ पूर्णांक ७२ शतांश टक्के, नाशिक ७ पूर्णांक ३१ शतांश टक्के आणि सोलापूरमधे १० पूर्णांक १७ शतांश टक्के वाढ रेडीरेकनरच्या दरात झाली आहे.
Site Admin | April 1, 2025 3:11 PM | राज्य सरकार | रेडीरेकनर
रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
