चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत मंडपम, राम मंदिरासाठी जिल्ह्यातलं सागवान पाठवलं आहे.
Site Admin | September 6, 2024 6:50 PM | chandrapur | Sudhir Mungantiwar
चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार
