डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ % पाऊस, १०२ % क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला आहे. तसंच राज्यात १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात २०१८ नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख लाभार्थ्यांना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. या योजनेमुळं अन्य योजना बंद होणार नाहीत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत सुरूच राहणार असल्याचं सरकारनं आज स्पष्ट केलं. 

 

राज्यातल्या ३६ हजारांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागानं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61 कोटी 52 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा द्यायला राज्य सरकारनं मान्यता दिली. पुणे – शिरूर – अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते शिरूर या 53 किलोमीटर मार्ग उन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर इथं तसंच  मीरा-भाईंदर, वर्धा जिल्ह्यातलं आर्वी,  नागपूर जिल्ह्यातलं काटोल, हिंगोली इथं न्यायालयं सुरू करायलाही सरकारनं मंजुरी दिली. 

 

राज्य मंत्रिमंडळ निर्णय 

 

  • पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार.
  • अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार.
  • शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य.
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान.
  • अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार.
  • औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.
  • थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
  • धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार.
  • काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा.
  • लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
    शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे.
  • राज्यात १२१ टक्के पेरण्या.
  • राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा