डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातल्या अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील. तसंच प्रशासनिक खर्चासाठी ६ कोटी २५ लाख रुपये खर्चासाठी मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यात पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली  यात शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्यानं समावेश करण्यात आला आहे. तसंच वैनगंगा आणि नळगंगा नदीजोड प्रकल्पाला या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

 

तसंच, आदिवासी भागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत वाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. अनुसुचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. विविध प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्प बाधितांना घरं देण्यासाठी विविध नियमांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्याता आला.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

 

  • शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता.
  • पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
  • आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता.
  • लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार.
    कर्ज उभारण्यास मान्यता.
  • आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
  • अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
  • विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड.
  • महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार.
  • कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय.
  • न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा.
  • सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट.
  • जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय.
  • ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.
  • अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा