डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

महाराष्ट्रात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरात ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळानं २७१ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याने निगराणी ठेवली आहे. तसंच, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा