सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क यापुढे भरावं लागणार नाही. त्याऐवजी केवळ स्व-साक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र दिली जातील. या निर्णयाचा फायदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच कोट्यवधी नागरिकांनाही होणार आहे.