एसटी प्रवास भाड्यात साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित असल्याचं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज सांगितलं. ते नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न आहे. या सगळ्याचा आर्थिक बोजा पेलता यावा, यासाठी भाडेवाढ करावी लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
येत्या वर्षभरात सुमारे साडे ३ हजार बस खरेदी केली जाणार आहे. शक्यतो भंगार किंवा जुनाट बसगाड्या काढून टाकून नवीन गाड्या खरेदी करण्याकडे राज्य परिवहन महामंडळाचा कल आहे. सुमारे १ हजार ३०० नवीन गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. बसस्थानकाची सुधारणा बीओटी तत्त्वावर केली जाणार आहे, असं ते म्हणाले.