डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 16, 2024 7:16 PM | ST

printer

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी  हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

 

एसटीला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं. प्रतिदिन ६० लाख प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला अशी माहिती त्यांनी दिली. यंदा भाडेवाढ न करता उत्पन्नात वाढ झाली हे प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक आहे, असं ते म्हणाले. सुमारे ३१ कोटी ३६ लाख रुपये उत्पन्न दररोज मिळाले असून मागच्या वर्षाच्या याच काळातल्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त  आहे, असं त्यांनी  सांगितलं.  

 

नियमित खर्चाबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे ५२ कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडल्यामुळे विक्रमी उत्पन्न झाले तरी इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर आणि सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे खर्च वाढला असल्यामुळे नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं  त्यांनी पुढे सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा