डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

 

पालघरमध्ये लवकरच नवं प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केली आहे. पालघर विभागातल्या ८ आगारांना प्रत्येकी ५ नवीन एसटी बस देण्यात येत असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा