एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना एसटीतर्फे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीसाठी उत्पन्नाचं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात देण्यात येणार आहे. चालक-वाहकांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी एक महिन्याकरता प्रायोगिक तत्वावर ही योजना महामंडळाने सुरू केली आहे. एसटी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमुळे एसटी महामंडळानं ऑगस्ट महिन्यात सुमारे १६ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.
Site Admin | September 24, 2024 6:54 PM | ST | एसटी