राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात आजपासून १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.
हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार साध्या बसचं भाडं ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, जलद सेवा बससाठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, रात्र सेवा बस ११ रुपये, निम आराम १५ रुपये, विनावातानुकूलीत शयन आसनी १५ रुपये, विनावातानुकूलीत शयनयान १६ रुपये, शिवशाही साठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी १६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
एसटी ची भाडेवाढ ही जनतेची लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केली आहे.