दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ – एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
Site Admin | September 6, 2024 9:12 AM | disabled passengers | reserved seats | ST Bus
एसटीच्या सर्व बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन
