परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीच्या अवमानना प्रकरणी काल झालेल्या आंदोलनात अनेक एसटी बसचं नुकसान झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या एसटी गाड्या वाशिम आगारात थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्याही वाशिम बस स्थानकावर उभ्या आहेत. यामुळे वाशिम येथील बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
Site Admin | December 12, 2024 3:31 PM | Parbhani | ST Bus | Washim