राज्यातल्या एसटी बस सेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे दररोज ३ कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते धाराशिव इथं बातमीदारांशी बोलत होते. सध्या एसटी महामंडळाला कोणत्याही नवीन सवलतीचा विचार करणं शक्य नाही. आणखी सवलती दिल्या तर महामंडळ चालवणं कठीण होईल, असं ते म्हणाले.
Site Admin | February 21, 2025 7:49 PM | Minister Pratap Sarnaik | ST Bus
एसटीचं दररोज ३ कोटींचं नुकसान
