एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पदभार स्वीकारला. ही जबाबदारी दिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.
सार्वजनिक सेवेत काम करताना जनतेचा विश्वास हीच खरी ताकद मानून पुढे जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आता ही नवी भूमिका पार पाडताना देखील प्रवाशांच्या हिताचा विचार सर्वात अग्रक्रमावर असेल, अशी ग्वाही सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली.