दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आणि भरारी पथक, ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरांद्वारे नजर ठेवण्याच्या अशा सूचना त्यांनी दिल्या.
Site Admin | February 11, 2025 7:58 PM | CM Devendra Fadnavis | HSC Exam | SSC Exam
SSC-HSC परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द
