इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर इतर शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिले आहेत. यासोबतच या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियानातर्गंत जनजागृती साप्ताह राबवला जाणार असल्याचंही शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. यावर्षी सुमारे ३१ लाख विद्यार्थी इयत्ता १०वी आणि १२वीची परीक्षा देणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश