राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या 5 हजार 130 मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे.
Site Admin | February 20, 2025 7:23 PM | SSC Exam
उद्यापासून दहावीची परीक्षा
