राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलं. स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही, असं ते म्हणाले. याठिकाणी झालेल्या दगडफेकीप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं