श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी सत्ताधारी पक्षातल्या २९ जणांची आज उपमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या सोमवारी राष्ट्रपतींनी २१ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली होती. श्रीलंकेचं आताचं मंत्रिमंडळ गेल्या काही दशकातलं सर्वात लहान आकाराचं मंत्रिमंडळ आहे.
आतापर्यंत शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये अनिल जयंथा फर्नांडो, हर्षना सुरियापेरूमा, नामल करुणारत्ने मोहम्मद मुनीर यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या संविधानानुसार जास्तीत जास्त ३० कॅबिनेट मंत्री आणि ४० उपमंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करता येतो.