सागरी सीमा हद्दीचा भंग केल्याप्रकरणी १३ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलानं अटक केली. हे सर्वजण तामिळनाडूचे आहेत. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन मच्छिमार जखमी झाले असून त्यांच्यावर जाफना इथं रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मच्छीमारांना अटक झाल्यानंतर त्यांच्या गावांमध्ये प्रचंड उद्रेक झाला असून त्यांच्या सुटकेसाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.
Site Admin | January 28, 2025 1:48 PM | Sri Lankan Navy | Tamil Nadu fishermen
१३ भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या नौदलाच्या अटकेत
