श्रीलंकेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युनायटेड नॅशनल पार्टी आणि समगी जना बालवेगया या दोन्ही पक्षांनी पहिल्या फेरीत संयुक्त आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या बैठकीनंतर आता निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी येत्या आठवड्यात या पक्षांच्या बैठका होण्याची शक्यता आहे. मार्च २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका झालेल्या नसून त्या यंदा मार्च महिन्यापर्यंत होतील अशी अपेक्षा आहे.