डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

श्रीलंका राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चर्चेसाठी बोलावले

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीचे आर्थिक व्यवहाराचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वासंबंधी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत होणारा सार्वजनिक संसाधनाचा वापर तसंच काही माध्यम संस्थांच्या निवडणुकीतल्या गैरवर्तनाबद्दल काही उमेदवारांनी या बैठकीत चिंता व्यक्त केली.  दरम्यान, या बैठकीनंतर निवडणूक निरीक्षकांसोबतही बैठक घेण्यात आली.

  निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यावर भर दिला आहे, असं निवडणूक आयोगाचे प्रमुख R M A L रत्ननायके यांनी सांगितलं. तसंच निवडणूक प्रचाराची पत्रकं घरोघरी वाटण्यासाठी जास्तीत जास्त पाच जण जाऊ शकतात, यापेक्षा जास्त लोक गेल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही ते म्हणाले. २१ सप्टेंबर रोजी श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा