श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. संसदेतल्या २२५ पैकी १५९ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला ४० जागा मिळाल्या आहेत. माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमॉक्रेटिक फ्रंटला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत.
Site Admin | November 15, 2024 8:26 PM | Elections | Sri Lanka
श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत
